Share

‘तुझा आमदार कुठे मेला? तो फक्त पोरींचे फोन उचलतो’

Published On: 

जळगाव : एकेकाळचे भाजपचे दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसेंनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला असून खडसेंनी आता भाजपच्या नेत्यांवरच प्रहार करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंच एक वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे. वडगाव बुद्रुक तालुका जामनेर मधील एका व्यक्तीने गावातील गंभीर पाणी प्रश्नासंदर्भात खडसेंना मदतीसाठी फोन केला होता. यावेळी, खडसेंनी या व्यक्तीला गावाचे व तालुक्याचे नाव विचारले असता ‘पाणी नाही, तर तुझा आमदार कुठे मेला?’ असा सवाल या ग्रामस्थाला केला. यावर त्याने ते फोन उचलत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं. यावर, ‘पोरीचा फोन उचलतो तो फक्त’ असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.

पुढे त्यांनी या ग्रामस्थाची तक्रार एकूण गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे आश्वासन देखील दिले. मात्र, जामनेर मतदारससंघाचे आमदार भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन हे असून त्यांच्याबद्दल खडसेंनी केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. याआधी देखील महाजन आणि खडसेंमधील वाद अनेकदा उफाळून आल्याचं समोर आलं होतं. आता खडसेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!