🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार सोबत घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडले. यानंतर पुढे त्यांनी भाजपसोबत जात राज्यात भाजप-सेना युतीच सरकार अस्तित्वात आणलं. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision) शिवसेना (Shivsena) पक्षाचं धुष्यबाण चिन्ह आणि नाव देखील गोठवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते प्रतिक्रिया देत असताना आता राष्टवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
यावेळी माध्यमांशी बोलताना खडसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर भाष्य केले. धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही असे खडसे म्हणाले. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चितच झाल्या असतील.पक्षप्रमुख म्हणून काम करताना चुका होत असतात. मात्र, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्षच संपून टाकावा असे म्हणत एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य केले.
यानंतर पुढे एकनाथ खडसे म्हणाले कि, बाळासाहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेना पक्ष वाढीसाठी घालवलं. त्यांनी संघर्षातून पक्षाची संघटना उभी केली होती. बाळासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा मिळाली होती. बाळासाहेबांची वर्षानुवर्ष असलेली ही पुण्याई आता ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात धुळीस मिळाली आहे. शिवसेना पक्षात दुभंगला आहे, पूर्णतः मोडला गेला आहे. ही बाब फक्त राज्याच्याच नाही तर शिवसेनेच्या दृष्टीनेही हिताची नाही अशी चिंता देखील खडसे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ravi Rana | श्री रामप्रभूंनी ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावलं ; आमदार रवी राणा यांची टीका
- Devendra Fadnavis | संविधानावर हल्ला करण्याची शिवसेना,काँग्रेसची पद्धत – देवेंद्र फडणवीस
- Ambadas Danve | अब्दुल सत्तार अन् अमृता फडणवीसांवर अंबादास दानवे यांचा घणाघात, म्हणाले…
- Travel Tips | कमी बजेटमध्ये होऊ शकते युरोप ट्रीप, कशी? ते जाणून घ्या!
- Raj Thackeray | राज ठाकरे अयोध्येला जाणार? अयोध्येतील महंतांनी भेट घेत दिले निमंत्रण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
