टीम महाराष्ट्र देशा: आयुष्यात एकदा तरी फॉरेन ट्रीप करणे, हे प्रत्येकाच्या आयुष्याला स्वप्नं असतं. फॉरेनर ट्रिप मध्ये प्रत्येकजण युरोपला जायला पहिले प्राधान्य देतो. कारण युरोप ट्रीप हे सुद्धा अनेकांचे स्वप्न असते. पण युरोप ट्रीप खूप खर्चिक आहे असे मानून अनेक लोक आपली युरोप ट्रीप रद्द करतात. पण कमी पैशात देखील तुम्ही युरोप ट्रीप करू शकता. 1 लाख रुपयांमध्ये 4 ते 5 दिवस आरामात युरोपमध्ये घालू शकतात. आम्ही आज तुम्हाला युरोपमधील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही 1 लाख रुपयांमध्ये आरामात 4 ते 5 दिवस फिरू शकतात.
बजेटमध्ये फिरता येणारे युरोप मधील देश
स्लोव्हाकिया
युरोपमधील सर्वात सुंदर देशांपैकी स्लोव्हाकिया एक देश आहे. स्लोव्हाकिया मध्ये तुम्ही कमी बजेट मध्ये देखील फिरू शकतात. हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला असून तिथे खाद्यपदार्थ आणि वाहतूक खूप स्वस्त दरात उपलब्ध होते. स्लोव्हाकिया मध्ये 1 लाख रुपयांमध्ये आरामात 4 ते 5 दिवस तुम्ही ट्रिप होऊ शकते.
रोमानिया
रोमानिया हा देश आपल्या सर्वांना परिचयाचा आहे. या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे हा देश जुन्या मंदिरासाठी आणि चर्चसाठी प्रसिद्ध आहे. रोमानिया देशांमध्ये सुंदर लँडस्केप दृश्य आहे. याचबरोबर रोमानिया मध्ये खाद्यपदार्थ आणि राहणे देखील खूप स्वस्त आहे.
पोर्तुगाल
स्टार फुटबॉलर रोनाल्डोचा देश अशी ओळख असलेला पोर्तुगाल तुम्ही 1 लाख रुपयांमध्ये आरामात फिरू शकतात. पोर्तुगाल हा सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. या देशांमध्ये सुद्धा राहणे आणि खाणे खूप स्वस्त दरात मिळते.
हंगेरी
वास्तुकलेचा खजिना म्हणून ओळख असलेला हंगेरी देश प्रत्येकाच्या स्वप्नातील सुंदर देश आहे. हा देश निसर्ग सौंदर्याने नटलेला असून हा देश चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्राईम लोकेशन आहे. हंगेरी मध्ये 3000 ते 4000 रुपयांमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
चेक रिपब्लिक
चेक रिपब्लिक हा एक असा देश आहे. जिथे प्रत्येकाला जायचे आहे. पण हा देश फिरण्यासाठी खूप महाग आहे असे समजून अनेक लोक तिथे जाणे टाळतात. परंतु, असे नसून हा देश फिरण्यासाठी अत्यंत स्वस्त असून इथे तुम्हाला राहण्यासाठी 1500 ते 2500 रुपये मोजावे लागतील.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | राज ठाकरे अयोध्येला जाणार? अयोध्येतील महंतांनी भेट घेत दिले निमंत्रण
- Eknath Shinde | धनुष्यबाणानंतर ठाकरेंच्या ‘या’ चिन्हांवर देखील शिंदे गटाचा दावा
- Bhaskar Jadhav | किरीट सोमय्या, रामदास कदम बोलण्याची तयारी करत आहेत ; भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली
- Viral Video | रिक्षावाल्याने केले ‘या’ तरुणीचे नृत्य कॉपी, बघा हा Funny व्हिडिओ
- Thackeray vs Shinde | शिंदे गटाकडून पक्षाच्या नावासाठी ३ पर्याय, ठाकरे गटाच्या चिन्हावर देखील केला दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

