Share

Ambadas Danve | अब्दुल सत्तार अन् अमृता फडणवीसांवर अंबादास दानवे यांचा घणाघात, म्हणाले…

Published On: 

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ केली असल्याचा प्रकार काल समोर आलं आहे. यावरुन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी घणाघात केला आहे.

अंबादास दानवे यांचा अब्दुल सत्तार यांच्यावर घणाघात –

सत्तार म्हणजे विकृती असून, त्यांनी आता फक्त स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ केली आहे. यापुढे ते कुणाकुणाला करतील हे दिसेलच, असा टोला अंबादास दानवे यांनी सत्तांरांवर लगावला होता.

अमृता फडणवीस यांच्यावर दानवे यांची टीका –

अमृता फडणवीसांनी काय-काय गमावलंय, पती मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर आले आहेत, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. सध्या राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार असल्याचा पुनुरुच्चार करत हे राज्याला नव्हे तर, गुजरातला मदत करणारं सरकार आहे, असं दानवे म्हणाले.

सत्तारांचं स्पष्टीकरण –

आम्ही फक्त चर्चा केली, मात्र, सर्व बातम्या पाहिल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं, आम्ही सूचना मांडल्या. मी कोणालाही शिवीगाळ केली नाही. मी 42 वर्षाचा राजकारणी आहे. ते क्लासवन अधिकारी आहेत. मी त्यांना काशी शिवीगाळ करेन असं स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!