जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या व्यवहारामुळे खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद त्यागावे लागले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी, ‘तुम्ही भाजप सोडताय तर ते तुमच्या मागे ईडी लावतील’ अशी मिश्किल टिपण्णी केली होती. यावर तडख उत्तर देत खडसे म्हणाले होते, ‘ त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन.’ खडसेंकडे नेमकी कोणती सीडी आहे याबाबत सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खडसे यांनी ईडीला सहकार्य करण्याचे सांगितलं आहे.
त्यामुळे सीडीची भाषा करणारे खडसे नरमल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सद्या राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात संवाद यात्रा सुरू आहे. भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ खडसे यांनी ‘त्या’ सीडीचा पुनरुच्चार केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे,’ असा इशाराच एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- डिलिव्हरीच्या वेळेपर्यंत काम करणाऱ्या महापौरांवर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- पडळकरांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा दावा गृहमंत्र्यांनी फेटाळला !
- ममता बॅनर्जींबाबत अमित शाह यांनी केलेलं ‘ते’ भाकीत खरं ठरणार ?
- ‘अक्कल गहाण ठेवलेला किंवा नशा करणारा माणूसच मोदींना डरपोक बोलू शकतो’


