मुंबई: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँकेच्या १० जागांची मतमोजणी सुरू आहे. राजकीय दृष्ट्या जळगाव जिल्हा बँक महत्वाची मानली जाते. राज्यभरात सर्वत्र निवडणुकांचे वातावरण सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत आहेत. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारनेच बाजी मारल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आधी भाजपचे नेते असलेले एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले आहेत. एकनाथ खडसे भाजपवर टीका करताना म्हणाले, गेली ४० वर्षे मी भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ४० वर्षे माझी अवहेलनाच केली गेली, असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला आहे. गेल्या ६ वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक क वर्गात होती. आती ती अ वर्गात आली आहे. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित या निवडणुकीचा निकाल आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं, अशा शब्दात खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गिरीश महाजन यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पळ काढला. अपयश येणार याची जाणीव त्यांना झाली होती. या निवडणुकीने जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊची ताकद किती आहे हे दाखवून दिल्याचं खडसे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातमी:
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- वीर दासने ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण , म्हणाला..
- ‘आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो’, मलिकांच्या फोटोला वानखेडेंचे फोटोनेच प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
