Share

किरीट सोमय्या प्रकरणावरुन छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, म्हणाले कि…   

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता,  याप्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी लोकसभा खासदार किरीट सोमय्या हे पुणे पोलिसात तक्रार दाखल करायला दिनांक ५ फेब्रुवारी शनिवार रोजी पुणे शहरात आले होते. किरीट सोमय्या हे  या घोटाळ्या संबंधी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घ्यायला गेले असताना पुणे शहरातील शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना पुणे महानगलिकेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की केली, या धक्काबुक्कीमध्ये किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. हल्ला झाल्यावर किरीट सोमय्या यांनी माझ्यावरचा हल्ला हा उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून झाला आहे असा आरोप केला होता. यावरून महाराष्ट्र राज्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले.

आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना या आरोपासंबंधी पाठिंबा दर्शवला आहे. आज मुंबईमध्ये बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले कि, ” पुणे महापालिकेत जे घडलं, ते अपघातानं घडलं; मुख्यमंत्री असलं काम करत नाही यावर माझा विश्वास आहे. आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविताना भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पण टीका केली.

आधी जोशीबुआ भविष्य बघायचे आता पाटील कस काय भविष्य बघायला लागले ?? पर्वा पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार येत्या काहीच दिवसात पडेल असे भविष्य वर्तविले होते. या भविष्यवाणीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!