बंगळुरू: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये खरेदीदार शोधण्याची सुरेश रैनाची आशा संपुष्टात आली आहे. पहिल्या दिवशी न विकला गेल्यानंतर, अनुभवी अष्टपैलू खेळाडू असलेला रैनाला स्पीड ऑक्शन खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले नाही, याचा अर्थ तो अधिकृतपणे शर्यतीतून बाहेर पडला आहे. म्हणेजच या हंगामासाठी तो स्पर्धेत खेळणार नाही.
‘मिस्टर आयपीएल’ म्हणून रैनाला ओळखले जायचे. आयपीएलमध्ये सुरेश रैनाने २०५ सामन्यांमध्ये ५००० हून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएल २०२२ हा दुसरा हंगाम ठरणार आहे ज्यात रैना खेळताना दिसणार नाही. २०२० मध्ये त्याने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली.मात्र तो पुढच्या वर्षी परतला आणि तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे स्पर्धेच्या शेवटच्या दोन सामने सोडता त्याने काही प्रभावी खेळी खेळल्या.
चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या ‘चिन्ना थाला’ म्हणजेच सुरेश रैनाला अनसोल्ड ठेवणे सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का ठरला आहे. या सोबतच रैना आणि चेन्नईचा दीर्घकाळ संबंधही संपुष्टात आला आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या आवृत्तीपासून रैनाचा चेन्नईचा भाग राहिला आहे. केवळ २०१६ आणि २०१७ सोडता जेव्हा चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती, ते दोन वर्ष सोडता तो चेन्नईचा अविभाज्य भाग होता.२०१८ मध्ये जेव्हा चेन्नई फ्रँचायझीमध्ये पुनरागमन झाले तेव्हा त्यांनी रैनाला रिटेन केले होते. मात्र यावेळी चेन्नईने रैनाला रिटेन तर केलेच नाही आणि पुन्हा संघात परत घेतले नाही. रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आधीच जाहीर केली आहे आता मात्र त्याला आयपीएलमधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या प्रकरणावरुन छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, म्हणाले कि…
- पुण्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित होणार; मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
- ‘…तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?’; ओबीसी मुद्द्यावरून अव्हाडांचा सवाल
- ‘…तर मीही अण्णा हजारे सोबत उपोषणाला बसेल’; नवनीत राणा यांचा इशारा
- काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

