औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल वाहनचोरट्याला पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. विकास विष्णू पट्टेकर (वय १९, रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, घाणेगाव,ता.गंगापूर) असे वाहन चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या ८ दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी सोमवारी (दि.१२) कळवली आहे.
एमआयडीसी वाळूज परिसरात वाहन चोऱ्या करून धुमाकुळ घालणारा अट्टल चोरटा विकास पट्टेकर हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी एन.आर.बी.चौकात येणार असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वाव्हळे, सहाय्यक फौजदार कय्युम पठाण, जमादार संजय हंबीर, प्रकाश गायकवाड, नवाब शेख, विनोद परदेशी, रेवनननाथ गवळे, अविनाश ढगे, गणेश पाटील, दिपक मतलबे, बंडू गोरे आदींच्या पथकाने एन.आर.बी. चौकात सापळा रचून विकास पट्टेकर याला गजाआड केले.
चौकशीदरम्यान, पट्टेकर याने एमआयडीसी वाळूज परिसरातून चोरून आपल्या मित्रांना विक्री केलेल्या १ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अटकेत असलेल्या विकास पट्टेकर याच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक सावंत यांनी वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंची गादी श्रेष्ठ, त्यांनी भाजपच्या खासदारीला लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव
- मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – नाना पटोले
- हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप
- ‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा
- ‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

