सातारा : पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी दिले आहे. त्यांनी आज पूरग्रस्त शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर शहराला देखील भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी केली. यासोबतच त्यांनी सातारा जिल्ह्याचा देखील दौरा केला.
राज्यात पूर, भूस्खलन आदी आपत्तीमुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मृत झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटलं आहे. अतिवृष्टीत भूस्खलनामुळे अनेक गावांवर संकट कोसळले असून हा धोका कशामुळे निर्माण झाला याबाबतची माहिती तज्ज्ञांकडून घेण्यात येईल. तसेच नैसर्गिक संकटाला प्राधान्य देऊन राज्यातील ९ जिल्ह्यातील धोकादायक गावांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे, असं पवार यांनी सांगितलं.
यासोबतच, ‘अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख आणि केंद्राच्या माध्यमातून दोन लाख, त्याच प्रमाणे शेतकरी असल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून दोन लाख असे एकूण मिळून नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’; राऊतांच्या पर्यटनाच्या टीकेला दरेकरांच प्रत्युत्तर
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
