मुंबई : राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. आणि अशात विरोधी पक्षाकडून ‘राजकीय पर्यटन’ केले जात आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे. त्यामुळे तळिये-चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थ करावी लागेल.
बाकी कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न. केवळ पाहायला आलो नाही, तर सर्वतोपरी मदतही देणार, असे विरोधी पक्ष सांगतोय. आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी आणखी काय बोलावे, केंद्राकडून काय आणायचे ते आणा; स्वागतच आहे.असा निशाना साधत संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे.
यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पप्रत्युत्तर दिलं आहे. ‘ आम्हीही लोकशाहीचे अविभाज्य भाग आहोत, लोकशाहीचे थट्टा करु नका,’ असं दरेकर म्हणाले. यासोबतच, ‘ज्यावेळी कोकणातील भीषण पूरपरिस्थितीबाबत मला माहिती मिळाली तेव्हा मुंबईत थांबणे मला प्रशस्थ वाटले नाही. त्यामुळे तातडीने मी सहकाऱ्यांसह कोकणाकडे धाव घेतली. फक्त याच वेळी नाही तर निसर्गसारख्या संकटात देखील त्याच रात्री मी कोकण गाठलं होतं. आपत्तीत धावून जाणं, मदत करणं, मदतीसाठी प्रयत्न करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे,’ अशा शब्दांत दरेकरांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?

