Share

शिष्यवृत्ती परीक्षाही ढकलल्या पुढे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा तर रद्द करण्यात आल्या आहेत. यात आता शिष्यवृत्ती परीक्षांचाही समावेश करण्यात आला आहे. आगामी २३ मे रोजी होणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल.’

राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच दुसरी लाट सुरू असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!