🕒 1 min read
मुंबई: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं ऑनलाइन व्याख्यान आयोजित केलं होतं. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांवर भाष्य केलं आहे. गांधीजींचे विचार अजरामर आहेत आणि ते भावी पिढीलाही मार्गदर्शक ठरणार आहेत. जेथे सत्य आहे, तेथे बापूजी जीवंत आहेत, ही बाब त्यांचे विरोधकही मान्य करतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यावेळी बोलताना वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाजप पक्षावर देखील निशाणा साधला आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करतात, पण त्यांच्या पक्षाची भूमिका ही वेगळी आहे, चुकीची आहे त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्या पक्षाचे लोक महात्मा गांधी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांचं समर्थन करतात, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
गांधीजींचे विचार अजरामर आहेत आणि ते भावी पिढीलाही मार्गदर्शक ठरणार आहेत.जेथे सत्य आहे, तेथे बापूजी जीवंत आहेत,ही बाब त्यांचे विरोधकही मान्य करतील. अहिंसा,अंत्योदय आणि सर्वधर्मसमभाव या त्रिसूत्रीच्या आधारावरच भारत भविष्याची वाटचाल करणार आहे. #GandhijiTheInfluencer#naitalim2022
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 30, 2022
पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजपला इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. जर इतिहास पाहिला तर लक्षात येईल की गाधींनी अनेक आंदोलनं केली. सत्य कधी लपून राहत नाही. जे नथूराम गोडसे (Nathuram Godse) शौर्य दिन म्हणून साजरा करतात त्यांना काय म्हणावं, अशांवर कारवाई करायला हवी, असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
-
“आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणू शकत नाही”, राजेश टोपेंचे वक्तव्य
-
औरंगाबादच्या पाटलांचा महाराष्ट्रात धुरळा; म्हणे महापालिका निवडणुकीसाठी ‘उमेदवार बायको’ पाहिजे!
-
सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का? संजय राऊतांचे टीकास्त्र
-
शिंगांच्या तस्करीसाठी होणाऱ्या गेंड्यांच्या हत्येवर मोदींनी जाहीर केली नाराजी; म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
