औरंगाबाद : महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध समस्या व आरटीईबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा निधी फी परतावा आणि राज्य सरकारचे धोरण या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हिंगोली येथे महाराष्ट्र इंग्रजी संस्थाचालक संघटनेने (मेस्टा ) भेट घेतली. इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबतच्या चर्चेसाठी राज्यपालांची राजभवन येथे पुन्हा भेट घेणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
इंग्रजी माध्यमांच्या शाळा आधीच अडचणीत सापडल्या आहेत. त्यातच दुसरीकडे आरटीई फी परतावा अद्यापही बाकीच आहे. तो देखील देण्यात आलेला नाही. तसेच दुसरीकडे फी कपातीचा निर्णय घेतल्याने अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी राज्यपालांकडे मेस्टाच्या वतीने चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंगोली येथे राज्यपाल यांची मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव दळवी यांनी शुक्रवारी (दि. ६) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. याशिवाय मेस्टाच्या वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितली आहे.
त्यासाठी मेलवर राज्यपालांना मेस्टाच्या वतीने पत्र देखील पाठविले होते. यावर राज्य सरकारने घेतलेल्या इंग्रजी शाळांच्या १५ टक्के फी कपातीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील राजभवन याठिकाणी बोलावले आहे. मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्या आदेशाने महाराष्ट्र इंग्रजी संस्थाचालक संघटनेचे (मेस्टा )प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव दळवी आणि हिंगोली जिल्हा मेस्टाचे पदाधिकारी, गजानन कदम, प्रा. डॉ. गजानन लोमटे आदी पदाधिकारी मुंबई येथे राजभवनात राज्यपाल यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे मेस्टाच्या वतीने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार, खासदार संजय जाधव यांचे विधान
- नीरज चोप्राप्रमाणेच राखी सावंतने फेकला भाला ; पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ
- शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला अटक होण्याची शक्यता
- भारतीय संघाला पहिल्या टेस्टपासून मिळेल ‘हा’ फायदा : दिनेश कार्तिक
- अनोखा उपक्रम! मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचे मोफत लसीकरण,आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

