Share

‘डिसेंबरअखेर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याभोवतीही ईडीचा फास’, किरीट सोमय्यांचे सूचक वक्तव्य

Published On: 

सांगली : सध्या सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने विविध प्रकरणात राज्यातील नेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब, खा.भावना गवळी, माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांच्याविरोधात कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेते संतप्त झालेत. तर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध घोटाळ्यांप्रकरणी डिसेंबर २०२१ पर्यंत ईडी निश्चितपणे फास आवळेल, असे सूचक वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले. ते सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी १९ बंगले खरेदी केले होते. या प्रकरणात आपण आवाज उठवल्यानंतर २०२१ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते स्वत:च्या नावावर करून घेतले आहेत. तसेच मुंबईतील दहिसर परिसरातील आरक्षित जमिनीचा व्यवहारही संशयास्पद असून यामध्ये सुमारे ५५० कोटींचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली त्यादिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला केला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून केवळ राज्याची लूट करत आहे.  ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपल्यावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला आहे. मात्र, मी ठाकरे सरकारातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी सज्ज आहे असे सोमय्या म्हणाले.

त्याचबरोबर आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे. पुढच्या आठवड्यात भावना गवळी यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचाही नंबर असून आव्हाड यांना आपली जाहीर नोटीस असणार आहे. त्यामुळे आव्हाड तुम्ही देखील आता बॅग भरायला लागा, असा इशारा किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!