Share

अनिल देशमुखांविरोधात ईडी ची लूक आऊट नोटीस? अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा दावा

Published On: 

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावली आहे. असा दावा अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यानुसार त्यांना लवकरच अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

दरम्यान १०० कोटींच्या घोटाळयाप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अनेकवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मात्र ते एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे ईडीने त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस काढली असल्याचे अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना आता देशातून बाहेर जाणे कठीण असणार आहे.

दरम्यान ईडीने अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार राहिले नाहीत. त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना त्यांनी निवेदन घेऊन पाठवलं होतं. त्यामुळे अखेर देशमुख आहेत कुठे? असा सवाल निर्माण झाला आहे. यावरच भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेत ठाकरे सरकार देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यातच आता ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात आता लूक आउट नोटीस काढली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. याबाबत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!