🕒 1 min read
मुंबई : १८ मार्च रोजी जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी आता मोठी राजकीय खेळी रचली गेली आहे.
भाजपाचे विद्यमान महापौर सुनिल खडके, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह २५ हुन अधिक नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत शिवबंधनात अडकण्याची तयारी केली आहे. हे कमी कि काय म्हणून शिवसेनेनं आणखी ५ नगरसेवकांना गळाला लावत भाजपचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन हेच संकटात अडकल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, भाजपाने महापौर निवडणुकीसाठी व्हीप जारी केला असून उर्वरित नगरसेवकांना महाजन यांनी अज्ञातस्थळी हलविले आहे. तर, भाजपचे 57 पैकी 30 नगरसेवक शिवसेनेत दाखल होणार असून हे सर्व नगरसेवक ठाण्यात असल्याचं समजत आहे. शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात हे नगरसेवक आहेत. यामागे शिवसेना नेते सुरेश जैन यांचं मोठं यश मानलं जातंय. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपचं खान्देशातील वर्चस्व कमी होत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- परस्त्री सोबत शॉपिंगला जाणे पडले महागात, भरबाजारात अदनानची आयशाने धुलाई केली
- ‘अजय -आतुल’ यांना मिळाला दशकातील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार
- युवासेना-भाजप वाद चिघळला : भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न, युवासेनेचा तुफान राडा
- खळबळ! बीडमध्ये प्रथम लस घेणाऱ्या डॉक्टरला कोरोना
- महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणासाठी आनंद महिंद्रांची मोदींकडे ‘ही’ मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
