पुणे : कोरोना महामारीमुळे गेली एक महिन्याहून अधिक काळ रिक्षाचालकांचे उत्पन्नाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे त्यांना रोजचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांचेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही रिक्षाचालकांच्या घरी वैद्यकीय अडचणीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुणे शहरासह राज्यामध्ये गेली एक महिन्याहून अधिक कालावधीत लॉकडाऊन सुरू असून हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचे रोजचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्यांना इतर कुठल्याही मार्गाने उत्पन्न नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालाविली आहे. वैद्यकीय उपचार करण्याकरिता त्यांना कुठल्याही प्रकारचे मदत किंवा आर्थिक स्त्रोत नाही. शासनाने राज्यातील रिक्षाचालकांना व इतर वर्गाला दीड हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केलेले आहे. परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचे मानधन रिक्षाचालकांना मिळालेले नाही. तसेच शासनाकडून अद्याप कोणतीही प्रणाली तयार केलेली नसल्यामुळे रिक्षा चालकांना मानधन मिळण्यामध्ये विलंब होत आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यचे खासदार गिरीश बापट यांनी काल शहरातील प्रमुख रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे धरणे आंदोलन केले. यावेळी भाजप खासदार गिरीश बापट यांच्या पाठीमागे एक आंदोलनकर्ता येऊन बसला. त्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म ‘ईडी’ असा होत होता. याचाच संदर्भ घेऊन एक जण म्हणाला, बापट साहेब, तुमच्या मागे ‘ईडी’ बसला आहे. हे ऐकताच गिरीश बापट म्हणाले, अशा ईडी फिडीना मी काय घाबरत नाही, असे वक्तव्य भाजप खासदार गिरीश बापट यांनी केले.
यावेळी खासदार बापट म्हणाले, राजकीय प्रवासात मी आजपर्यंत असंख्य आंदोलने केले आहेत. त्यामुळे मी अशा ईडी-फिडीला मी घाबरत नाय, आणि ईडीला आमच्याकडे येऊन काय मिळणार ? कारण आमच्या खिशात चणे-फुटाणे असतात.आणि आमच्यासाठी ईडी म्हणजे रिक्षाचालक आहे, हे वाक्य उच्चारताच उपस्थितांमध्ये जोरदार हास्य-कल्लो माजला असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
- मराठा आरक्षणासाठी आक्रोश मोर्चाला बीडपासून सुरुवात
- म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
- गेवराईत नियमांचे उल्लंघन करणारे चार दुकाने सील
- सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू


