मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक केली आहे.
यानंतर ईडीने आणखी एक पाऊल पुढे टाकत देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता ही नागपूरमधील असल्याची माहिती आहे. पण या मालमत्तेत नेमकं काय-काय आहे याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही.
अनील देशमुख ₹१०० कोटीचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात गुंतले आहे. आज ईडीने 420 लाख ची मिळकत जप्त केली, हळू हळू ₹100 कोटींची मालमत्ता जप्त होणार
मला खात्री आहे की एके दिवशी अनिल देशमुखला ईडीकडे हजर व्हावे लागणार आणि नंतर जेलला जावे लागेल @BJP4Maharashtra pic.twitter.com/DyEBMcm0tM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 16, 2021
मालमत्तेच्या जप्तीची कारवाई ही देशमुखांना मोठा धक्का मानला जात आहे. ईडीने ट्विटद्वारे आज केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. दुसऱ्या बाजूला या कारवाईनंतर आता भाजपनेते किरीट सोमय्या यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या म्हणाले, अनील देशमुख हे १०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात गुंतले आहेत. आज ईडीने 4.20 कोटीची मिळकत जप्त केली, हळू हळू100 कोटींची मालमत्ता जप्त होणार. मला खात्री आहे की एके दिवशी अनिल देशमुखला ईडीकडे हजर व्हावे लागणार आणि नंतर जेलला जावे लागेल असा दावा सोमय्या यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेश सरकारने करोनाची दुसरी लाट अभूतपूर्व पद्धतीने नियंत्रणात आणली; मोदींकडून योगींचे कौतुक
- जेजुरीगडाच्या विकासासाठी अजित पवारांचा पुढाकार ! दिला तब्बल ‘इतका’ निधी
- सुशांतच्या बहिणीने ‘पवित्र रिश्ता २’ वर शेअर केली भावूक पोस्ट
- नाना पटोले काहीही बोलले तरी महाविकास आघाडीला धोका नाही – अजित पवार
- कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये कोणत्याचं खेळाडूची जागा सुरक्षित नाही : मोहम्मद कैफ


