मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्यांच्या मागे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास देत असल्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र, विरोधकांच्या आरोपांनंतरही ईडी, सीबीआयचे छापे सुरूच आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी दुसऱ्यांदा छापे टाकण्यात आले आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरावर ईडीने काल शुक्रवारी छापे टाकले. जवळपास ९ तासांहून अधिक काळ चौकशी झाली. त्यानंतर रात्री देशमुख यांच्या स्वीयसहाय्यक आणि खासगी सचिवांना अटक करण्यात आली. तर आज शनिवारी सकाळी ११ वाजता देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. या ईडी चौकशीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना स्टाईलने प्रतिक्रिया दिलीये.
‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिवसेनेलाही विनाकारण त्रास दिला जातोय. पण महाविकास आघाडी खंबीर आहे. आम्ही बघून घेऊ’, असा रोखठोक इशारा राऊत यांनी दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कुणीही सीबीआय चौकशीची मागणी केल्याने ती होत नसते’, गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
- सलमानशी पंगा पडला महागात; केआरकेने मागितली माफी
- इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का ; जोस बटलर एकदिवसीय मालिकेतून बाहेर
- ‘मी आता स्वत: श्वास घेत आहे’; ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध दवेची कोरोनावर मात
- जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
