पुणे : कुणीही सीबीआय चौकशीची मागणी केल्याने ती होत नसते, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांच्या चौकशीवरून शुक्रवारी लगावला. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अधिकारी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडी कारवाईबाबत मी अधिक बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहेत. पण चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सध्या सर्वांचे लक्ष कोरोनाच्या उपाययोजनांकडे असले पाहिजे. परंतू, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे.
विरोधी पक्षनेतेे देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर वळसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात सध्या कोरोनाचे संकट फोफावले असताना फडणवीस राजकारण करू पाहत आहेत. तसेच, मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- सलमानशी पंगा पडला महागात; केआरकेने मागितली माफी
- इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का ; जोस बटलर एकदिवसीय मालिकेतून बाहेर
- ‘मी आता स्वत: श्वास घेत आहे’; ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध दवेची कोरोनावर मात
- जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

