🕒 1 min read
इंग्लंड : श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणार्या मर्यादित षटकांच्या मालिकेत यजमान इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जोस बटलर दुखापतीमुळे श्रीलंकेसह उर्वरित टी-२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेपासून दूर झाला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करुन बटलरच्या बाहेर पडण्याविषयी माहिती दिली आहे.
गुरुवारी सकाळी बटलरला एमआरआयसाठी नेण्यात आले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर बटलरला त्रास झाला. ईसीबीनेही बटलरच्या बदलीची घोषणा केली आहे. डेव्हिड मालनला बटलरच्या जागी श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या टी -२० सामन्यात बटलर खेळला नाही. इंग्लंडने हा सामना पाच विकेट्सने जिंकला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. बटलरने अलीकडेच म्हटले होते की कुटुंबीयांशिवाय एशेज मालिकेसाठी खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये जाणे कठीण होईल. या वक्तव्यानंतर तो चर्चेत आला होता.
इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 च्या निलंबनानंतर जोस बटलर मेच्या सुरूवातीस इंग्लंडला परतला. जूनच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत, ईसीबीने बटलरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. बटलरने मर्यादित षटकांच्या मालिकेत संघात पुनरागमन केले होते आणि पहिल्या टी -२० मध्ये संघ जिंकून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचेही त्याने दर्शविले होते.
यापूर्वी जोस बटलरने आयपीएल 14 मधील उर्वरित सामने मागे घेण्याचीही घोषणा केली आहे. जोस बटलर म्हणाला की, इंग्लंडकडून खेळणे ही त्याची प्राथमिकता आहे. राष्ट्रीय कर्तव्य वगळता राजस्थान रॉयल्सच्या आयपीएलमध्ये आपण भाग घेऊ शकत नाही, असे बटलरने स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
- ‘पुढील सामन्यात स्थान मिळेल का?’ सॅम करनने केले ट्विट
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
