Share

जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!

Published On: 

🕒 1 min read

जालना: जिल्ह्यात मारठवड्यातील पहिला पीएसए ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. शुक्रवारी याचे लोकार्पण आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अशाच पद्धतीने हवेतून ऑक्सिजन शोषून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी लवकरच करणार असल्याची माहितीही यावेळी टोपे यांनी दिली.

मंत्री टोपे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ८० लाख रुपये खर्च करून हवेतून ऑक्सिजन शोषून त्यावर प्रकिया करून शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए ऑक्सिजन प्लँटची उभारणी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात करण्यात आली आहे. हा प्लँट अत्यंत आधुनिक असून ६०० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्मिती यातून होण्याबरोबरच दरदिवशी १२५ जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

जिल्ह्यात अनेक स्टील उद्योगांनी ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्लँटची उभारणी केली असून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण झाला आहे. लवकरच जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये डीआरडीओ, एसडीआरएफ, सीएसआर तसेच जिल्हा नियोजन मंडळातून आधुनिक असे पीएसए प्लँट उभारण्यात येणार असल्याचेही मंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!