लातूर : सध्या देशात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे केंद्र सरकारने कोरोना संदर्भात काही नियम तयार केले आहेत. अशाच एक नियमात लातूरची विद्यार्थिनी अडकली होती. ढोकी येथील विद्यार्थिनीचे युक्रेनला जाताना विमान सुटले. कोरोना चाचणी केली नसल्यामुळे तिला विमानतळावर थांबण्यात आले. ही बाब खासदार श्रुंगारे यांच्या कानावर पडताच त्यांनी तिला मदत करत सुखरूप युक्रेन पर्यंत पोहचविले.
ढोकी येथील विद्यार्थिनी निकिता निवृत्ती थिटे ही युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेते. ती काही दिवसांपूर्वी गावाकडे आली होती. पण पुन्हा तिचे कॉलेज सुरु झाल्याच्या कारणाने तिला युक्रेनला परतायचे होते. तिने सर्व तयारी केली, दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर तिला कळले की २४ तासाच्या आत केलेली कोरोना चाचणीच ग्राह्य धरली जाते.
त्यामुळे तिला विमान प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. दिल्लीला कोणी ओळखीचे नसल्यामुळे तिच्या समोर संकट उभे राहिले. तिने घडलेली सर्व घटना घरी सांगितली. तिच्या वडिलांनी ही संपूर्ण घटना समाजसेवक हर्षवर्धन राऊत यांना सांगितली, त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता खा. शृंगारे यांना कॉल करत ही घटना त्यांनाच कानावर घातली.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलमध्ये वाढणार चुरस ; आगामी हंगामात होणार नवीन संघांचा समावेश
- गुन्हे शाखे पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेने केली मोक्कातील आरोपीला अटक
- घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही; शरद पवारांचा कोश्यारींवर प्रहार
- भावोजी आदेश बांदेकरच्या मुलाचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण
- मोठी बातमी : महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंचे अमित शहांना पत्र !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
