Share

आयपीएलमध्ये वाढणार चुरस ; आगामी हंगामात होणार नवीन संघांचा समावेश

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यास निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

यंदाच्या हंगामात संघांची संख्या वाढवणार असल्याची शक्यता यापूर्वी वर्तविण्यात येत होती. मात्र बीसीसीआयने आगामी हंगामात केवळ आठच संघ कायम राहतील असे स्पष्ट केले. परंतु आता पुढील हंगामात म्हणजे आयपीएल २०२२ मध्ये संघांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयपीएलच्या आगामी हंगामात दोन नवीन संघांचा समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ आठ नाही तर दहा संघ विजेतेपदासाठी झुंजताना दिसतील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबत माहिती देतांना म्हंटले, “आयपीएल २०२२ मध्ये दहा संघ खेळतील. यावर्षी मे महिन्यापर्यंत हे संघ निश्चित केले जातील. जेणेकरून ते आपली पुढील प्रक्रिया सुरू करू शकतील. कारण ती प्रक्रिया पूर्ण करायला देखील वेळ लागू शकतो.”

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने यापूर्वीच या गोष्टीचे संकेत दिले होते. आयपीएलच्या आगामी हंगामात दोन नवीन संघ समाविष्ट केले जाऊ शकतात, हे त्यांनी सांगितले होते. याबाबत विचार करण्यासाठी १३ मार्च रोजी बीसीसीआयची एक बैठक देखील बोलावण्यात आली होती. मात्र या टीम कोणत्या आणि त्यामध्ये कोण असेल याबाबत सध्या गोपनीयता राखण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!