मुंबई : अभिनेता आदेश बांदेकर हे ‘होम मिनीस्टर’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आहेत. आता त्यांचा मुलगा सोहम बांदेकर आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पन करत आहे. आदेश बांदेकर यांची स्वत:ची निर्मिती असलेल्या ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरु आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या दांपत्याच्या सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. नवे लक्ष्य या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेण्यात आला आहे. राज्याच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्य गाथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
सोहम बांदेकरची ‘नवे लक्ष्य’ ही पहिलीच मालिका आहे. आतापर्यंत अनेक सेलीब्रीटीच्या मुलांनी मालिका आणि चित्रपटातून मराठी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. सोहम बांदेकरचीही त्यात आता भर पडली आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या दांमत्यांनी दीर्घकाळ छोट्या पडद्यावरील मराठी तसेच हिंदी मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करुन आपले स्थान निर्माण केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंचे अमित शहांना पत्र !
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून महाराष्ट्रामध्ये ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, निलेश राणेंची मागणी
- जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील काही मतदार सहलीवर रवाना
- पाच पैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता येणार, शरद पवारांचे भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
