🕒 1 min read
अमरावती : भारतात प्रामुख्याने राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब प्रदेशात साजरा होणाऱ्या करवा चौथ या व्रत आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
दरवर्षी कार्तिक महिन्याच्या चौथ्या (चतुर्थीस) करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदीभाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच शिव शंकराला व सूर्याला जल अर्पण करुन सकाळ ते रात्री चन्द्रदर्शनापर्यंत उपवास करतात. आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात.
त्यानंतर विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साज श्रुंगार करून पीठ चाळण्याच्या चाळणीत आधी चंद्र व नंतर आपल्या पतीचे मुखदर्शन घेवून त्यांच्या हातून पाणी पिऊन हा उपवास संपवतात.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा रविवारी दिवसभर उपवास करून रात्री चंद्र व नंतर पती आमदार रवी राणांचे मुखदर्शन घेवून करवा चौथचा उपवास सोडला. यावेळी नवतीत राणांनी संपूर्ण श्रुंगार करुन त्यांच्या पतीच्यी दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. पती रवी राणा यांच्या हातून पाणी पिल्यानंतर नवनीत राणांनी त्यांचा उपवास सोडला.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्ध पहिल्यांदाच जिंकल्याचा अभिमान : शाहीन आफ्रिदी
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- टीम इंडिया हरली, पण धोनीचा ‘हा’ व्हिडिओ सोशल मीडियावर होतोयं व्हायरल
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

