Share

खा. इम्तियाज जलील यांना तडीपार करा, नागराज गायकवाड यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील हे विशिष्ठ समाजासाठी कार्यरत आहे. त्यांच्यावर अनेक कलमांतर्गत विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहे. ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतत अरे तुरे करत असतात. त्यांच्या अशा वागणुकीमुळे त्यांना तडीपार करण्याची मागणी आरपीआय (ए) चे मराठवाडा युवक प्रमुख नागराज गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

नागराज गायकवाड म्हणले कि, दलित चळवळीत काम करताना आलेल्या अनुभवातून एखाद्या कार्यकर्त्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले तर त्याच्यावर तडीपारी, हद्दपारी, झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायदा, मोक्का अशा विविध कलमांनी कारवाई होत असते. आणि अनेक कार्यकर्त्यावर तशी कारवाई झाली देखील आहे. परंतु, पोलीस प्रशासन खा. इम्तियाज जलील यांना पाठीशी घालत आहे.

कायदा सर्वांना सारखा आहे मग तो सामान्य व्यक्ती किंवा खासदार. परंतु, सध्याची स्थिती पाहता हा मापदंड खा. इम्तियाज जलील यांना लागू होत नाही आहे. नुकताच त्यांनी एका महिला पोलीसाशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचा गुन्हा देखील पोलिसांनी न नोंदवता, कामगार उपायुक्त यांची फिर्याद घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा दाखल केला. त्यावर देखील पुढे काही कारवाई करण्यात आली नाही.

शहरातील तसेच जिल्यातील वातावरण गढूळ करण्यासाठी जे-जे करता येईल ते सगळे उपक्रम खा. इम्तियाज जलील घेत आहे. यात जिल्हा प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत गोंधळ घालणे. दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणे. शासकीय कार्यालयात जावून सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना अरेरावी करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे, त्याला अनुसरून प्रक्षोभक विधाने करणे अशा प्रकारचे अनेक कार्य खा. इम्तियाज जलील यांच्या मार्फत होत आहे. काही प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहे. परंतु ठोस कारवाई करत त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी मराठवाडा युवकप्रमुख नागराज गायकवाड यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!