Share

खा. भागवत कराडांच्या रुपाने औरंगाबादला पहिले केंद्रीय मंत्रीपद, मनपा निवडणूकीत भाजपला होणार फायदा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भागवत कराड यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिले केंद्रीय मंत्री पद मिळाल्याने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच केंद्रीय मंत्री पद असल्याने निश्चितच शहरातील विकासकामांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर होऊ घातलेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. कराडांच्या या मंत्रिपदाने शहरात भाजपचे वजन आणखीनच वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे औरंगाबाद मनपा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला आणखी सतर्क होण्याची गरज आहे.

बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात खा. डॉ भागवत कराड यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. डॉ. कराडांनी राज्यसभेच्या खासदारकीसह आता थेट मंत्री पदच मिळाल्याने शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या दिड वर्षांपासून औरंगाबाद मनपा निवडणूकीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. मनपा निवडणूकीवर अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाही. मात्र लवकरच निवडणूकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. राज्यात शिवसेना-भाजप युती असताना शहरातही भाजप आणि शिवसेनेने मिळून मनपा निवडणूक लढली होती.

मात्र सद्यपरिस्थिती वेगळी आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. त्यामुळे शहरात येत्या निवडणुकांमध्ये हि युती पुन्हा दिसण्याची शक्यता कमीच आहे. मनपा निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीसोबत लढू शकते. तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र भाजप एकट्याने निवडणूक लढण्याची जोरदार तयारी करत आहे. त्यातच आता भागवत कराडांच्या रुपात केंद्रीय मंत्रीपद शहरात आल्याने मोठमोठी विकासकामे चुटकीसरशी होतील. आणि याचाच मोठा फायदा मनपा निवडणूकीत भाजपला होणार आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!