Share

मैदानातील खराब कामगिरीवरील टीकांनंतर पृथ्वी शॉचं टीकाकारांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ अपयशी ठरला, यानंतर शॉवर चौफेर टीका झाली. ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शॉ बोल्ड झाला. या मॅचमध्ये त्याला एकूण 4 रनच करता आले. या कामगिरीनंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिल याला संधी मिळू शकते.

आयपीएल 2020 पासूनच पृथ्वी शॉ मैदानात संघर्ष करत आहे, त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. त्यावरच आता पृथ्वी शॉने सडेतोड उत्तर दिले आहे. इंस्टग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले कि, ‘जर तुम्ही करणाऱ्या कामावर दुसरी व्यक्ती टीका करत असेल, तर याचा अर्थ ती व्यक्ती ते काम करू शकत नाही, पण तुम्ही करू शकता,’

ऍडलेड टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्येही तो अशाच पद्धतीने आऊट झाला. भारताने या टेस्ट मॅचमध्ये केएल राहुल आणि शुभमन गिलच्याऐवजी पृथ्वी शॉ याला संधी दिली. पहिल्या इनिंगमध्ये तो दुसऱ्या बॉलवर एकही रन न करता आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला 4 रन करता आले. या खराब कामगिरीमुळे शॉऐवजी शुभमन गिल याला संधी मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!