Share

‘मोदींना प्रश्न विचारण्याची हिंमत दुतोंडी भाजपात नाही’, सचिन सावंत यांची टीका

Published On: 

मुंबई : येथील लालबागचा राजा गणपती व पुणे येथील चौथा मानाचा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘शरिया’ लागू करणे बाकी ठेवले आहे’ अशी टीका केली होती. त्याला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ‘इथे मुख्यमंत्री शब्दाऐवजी मोदी हा शब्द वाचावा कारण उत्सवावर निर्बंध तर मोदींनी घातले आहेत. राज्यसरकार केवळ मोदींच्या आदेशांचे पालन करत आहे’. असे उत्तर सचिन सावंत यांनी दिले आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत भाजपा नेते अतुल भातखळकरांचे ट्विट रिट्विट करत म्हणाले, इथे मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मोदी हा शब्द वाचावा कारण उत्सवांवर निर्बंध मोदींनी घातले आहेत. राज्य सरकार केवळ मोदींच्या आदेशाचे पालन करत आहे. मोदींना हा प्रश्न विचारण्याची हिंमत दुतोंडी भाजपात नाही. असे ट्विट सचिन सावंत यांनी केले.

दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठी गर्दी आढळून आल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी मिरवणूक थांबवत गर्दी न करण्याचे आवाहन भक्तांना केले. त्यानंतर काही वेळाने ही मिरवणूक पुन्हा विसर्जनासाठी रवाना झाली. तर दुसरीकडे पुण्यातील चौथा मानाचा गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी या मंडळाचे ढोल-ताशे जप्त केले होते. काही वेळाने हे जप्त केलेले साहित्य काही वेळानंतर परत करण्यात आले होते.

यंदा कोरोनाची तीसरी लाट येण्याची धास्ती प्रशासनाला असल्याने राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. तसेच संशयित दहशतवादी पकडल्यामुळे हल्ले होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे मुंबईसह प्रसिद्ध गणपती मंडळांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासाठी मंडळांना ऑनलाईन दर्शन, मर्यादीत जणांना मुखदर्शन अशा उपायांचा अवलंब करण्यास सुचविले होते. मात्र तरीही काही मंडळांनी या नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी या मिरवणुका थांबवत गर्दी न करण्याचे आवाहन करत कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!