चंद्रपूर : संपूर्ण जगावर तसेच देशावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन अक्षरशः थांबले. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. मात्र या संकटातही केवळ कृषी क्षेत्रामुळे आपण तग धरु शकलो. कोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले, असे विचार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेताच्या बांधावर आयोजित ‘शेतकरी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या वेदना आणि अडचणी जाणून घेणे तसेच खरीप हंगामाच्या सुरवातीलाच प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून कृषी विभागामार्फ़त त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, बीज टाकण्यापासून ते उत्पादन हाती येईपर्यंत काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्पन्न जास्त घेण्याच्या लालसेमुळे रासायनिक खतांचा वापर वाढला. त्यामुळे शेतीची पत बिघडली. सेन्द्रिय शेती तसेच जैविक खतांचा वापर आज काळाची गरज झाली आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यासाठी सलग दोन वर्षात 28 कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. भविष्यात मजूरांची कमतरता जाणवणार असल्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. शेतात निंबोळी अर्क टाकला तर 70 टक्के खर्च वाचतो व शेतकऱ्याची बचत होते. बचतीचा मार्ग प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सर्वांना सांगितला आहे. त्यामुळे निंबोळी अर्क, उत्तम बियाणे, उगवण क्षमता याचे चांगले नियोजन करा. गोसेखुर्दमुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल, असेही पालकमंत्री यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वबळाची भाषा करणे चुकीचे नाही फक्त पायाखालची जमीन तपासून घ्या’, सामनातून पुन्हा कॉंग्रेसला डिवचले
- पुजाराची खिल्ली उडवणाऱ्या श्रीलंकन चाहत्याची भारतीयांनी घेतली फिरकी
- ‘रक्षाबंधन’ चित्रपटातील अक्षयचा लुक पहिल्यांदाच आला समोर
- ‘समांतर २’ चा ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीची झाली एन्ट्री
- राजकीय भूकंपाची नांदी ? दिल्लीत शरद पवारांचे प्रशांत किशोरांसोबत खलबतं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

