Share

‘रक्षाबंधन’ चित्रपटातील अक्षयचा लुक पहिल्यांदाच आला समोर

Published On: 

मुंबई : गेल्या एक वर्षभरापासून देशभरात सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे सर्व जनजिवन ठप्प झाले होते. मात्र कालांतराने सर्व जनजिवन प्रगतीपथावर परतले आहे. यातच बॉलीवूडमध्येही बंद पडलेले आणि रखडलेले प्रोजेक्ट मार्गी लागत आहे. तर अनेक रखडलेल्या चित्रपटांचे चित्रकरणही सुरु झाले आहे.

बॉलीवुडचा खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमारनेही त्याच्या रखडलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. आज २१ जुन रोजी त्याने त्याच्या आगामी रक्षाबंधन या चित्रपटातील त्याचा लुक ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटमध्ये अक्षय म्हणतो की, ‘मोठा होत असताना माझी बहीण असका ही माझी सर्वात चांगली मित्र होती. आनंद एल राय यांचा आगामी चित्रपट रक्षाबंधन हा तिला समर्पित आणि आमच्या या गोड नात्याचा उत्सव असेल. आज चित्रीकरणाचा पहिला दिवस आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा पाठीशी असु द्या.’ असे ट्विट केले आहे.

बहिण आणि भावाच्या नात्यावर आधारीत ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय हे करत आहे. तर या चित्रपटात अक्षयसोबत भुमी पेडणेकर आहे. आनंद एल राय यांच्यासोबत अक्षयने यापुर्वी ‘अतरंगी रे’ हा चित्रपट केला होता. ‘अतरंगी रे’चे चित्रिकरण पुर्ण झाले असुन तो प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षयसोबत सारा अली खान आणि धनुष हे कलाकार असतील. तसेच येत्या २७ जुलै रोजी अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!