Share

‘दुनियादारी’ला ८ वर्षे पूर्ण, स्वप्नील जोशीने दिला आठवणींना उजाळा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेला ‘दुनियादारी’ चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील पात्र, गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटाने १९ जुलै रोजी ८ वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ‘दुनियादारी’ची पूर्ण टीमचा फोटो असून त्याने दुनियादारीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ म्हणत दिग्या आणि श्रेयस या दोघांनी मैत्री, प्रेम आणि दुनियादारीचा धडा प्रेक्षकांना शिकवला. दिग्दर्शक संजय जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी , जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, उदय सबनीस, सुशांत शेलार आणि योगेश शिरसाठ यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CRf1ifIF9k3/

शिरीन, श्रेयस आणि मीनू यांची प्रेमकथा, त्याला दिंग्य आणि श्रेयसची मैत्री असा रोमँटिक, कॉमेडी, ट्रॅजेडी आणि भावनाप्रधान असलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सुरेख गाणी आणि एकापेक्षा एक मोठे कलाकार यामुळे हा चित्रपट खूप गाजला. आजही या चित्रपटातील ‘जिंदगी जिंदगी,टिक टिक वाजते,यारा यारा,देवा तुझ्या गाभाऱ्याला हि गाणी ऐकली जातात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!