Share

‘या’ कामगिरीमुळे पृथ्वी शॉने केली धोनी-कोहलीशी बरोबरी

Published On: 

मुंबई : खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून बाहेर पडलेल्या पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा एकदा धडाकेबाज शतकी खेळी करत  सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली आहे. कर्नाटकविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीनं आणखी एक शतक झळकावलं.

पण, पृथ्वी फॉर्मात दिसला. त्यानं ७९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्याच्या या शतकी खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. विजय हजारे ट्रॉफीतील त्याचे हे चौथे शतक ठरले आणि त्यानं यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या देवदत्त पडीक्कल ( ६७३ धावा) यालाही मागे टाकले. पृथ्वीच फटकेबाजी अजूनही सुरू आहे आणि मुंबईनं २७ षटकांत २ बाद १५३ धावा केल्या आहेत.

पृथ्वीनं या पर्वात चार शतकं झळकावून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटनं २००८-०९च्या विजय हजार ट्रॉफी मोसमात चार शतकं, तर देवदत्तनं यंदाच्या मोसमात चार शतकं झळकावली आहेत. पृथ्वीच्या नाबाद १८५ धावांच्या खेळीनं महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला, लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!