🕒 1 min read
मुंबई : इंडियन प्रिमीअर लीग ही स्पर्धा भारतीय क्रिकेटच्या चांगल्याच पथ्यावर पडली आहे. कारण जगभरात लोकप्रिय असलेल्या या लीगमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू सहभाग घेतात. दिग्गज खेळाडूच्या सहभागामुळे आयपीएलमध्ये सहभागी भारतीय युवा खेळाडूंना फायदा होत आहे.
आगामी जुलै महिन्यात भारतीय संघाचा श्रीलंकेचा दौरा आयोजीत करण्यात आला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू अनुपस्थित राहणार आहे. तरिही श्रीलंका संघाची मागील काही काळातील कामगिरी पाहता भारतीय संघ या दौऱ्यावर वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेला दारुण पराभवाला सामोर जावे लागले होते. खराब कामगीरीमुळे भारतीय संघातून बाहेर झालेले अनेक खेळाडू या दौऱ्यात चांगली कामगिरी करत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. खराब कामगीरीमुळे आधिच अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या श्रीलंका संघ भारतीय संघाचा सामना कसा करते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
श्रीलंका दौऱ्यामध्ये ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामने खेळवण्यात येतील. आयपीएल स्पर्धेमुळे भारतीय संघाची बेंच स्ट्रेन्थ ही भक्कम बनली आहे. याचा प्रत्यय आगामी श्रीलंका दौऱ्यात येणार आहे. कारण याचवेळी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि इतर प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यावेळी बीसीसीआयने प्रमुख खेळाडूच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर नसलेल्या खेळाडूंचा एक संघ श्रीलंकेला पाठण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- ‘क्वारंटाइन कालावधीमध्ये टॉवेलनं बॉलिंगचा सराव करत आहे’
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
