औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांच्या ऐवजी डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. कराड यांच्या रुपाने राज्यातील ओबीसी चेहरा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसणार आहे. मात्र, मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्र्यांची यादी पाहिली तर त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
डॉ. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर आहेत. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुक लढवली असली तरी त्यांना पराजयाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी देत राज्यसभेचे सदस्य केले. मात्र, त्या वेळी पंकजा मुंडे यांना शांत करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्याला ही संधी दिली गेल्याची चर्चा होती. डॉ. भागवत कराड हे ओबीसी समाजाचे चेहरे असले तरी, त्यांना केंद्रात काम करण्याचा अनुभव नाही. त्यांना राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच संधी दिली होती. मात्र, डॉ. प्रीतम मुंडे यांचा दिल्लीतील अनुभव जास्तच आहे. तसेच ओबीसी चेहरा म्हणून डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडे पाहिले जाते.
असे असताना डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलले गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र भाजपवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसमधून आलेले नारायण राणे, राष्ट्रवादीमधून आलेल्या भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. मात्र, डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून ओबीसी म्हणून डॉ. कराडांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये भविष्याचा विचार करुनच संधी दिली जातेय. यावरुन आगामी काळातील राजकारण कोणत्या दिशेने जाईल, याचा अंदाज येतो.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दोन लाटेमधील काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा – उद्धव ठाकरे
- मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ ; प्रकाश जावडेकरांनी सुद्धा दिला राजीनामा
- भाजपमध्ये पक्ष सदस्य होण्यापूर्वी आयारामांना मंत्रीपदाची संधी? चाकणकरांची टीका
- अखेर विद्यापीठातील बीकॉमच्या विद्यार्थ्यांना मिळणार न्याय, दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश!
- ‘भाजपने ईडी आणि सीबीआयला कामाला ठेवलंय, सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जातील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
