Share

‘भाजपने ईडी आणि सीबीआयला कामाला ठेवलंय, सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जातील’

Published On: 

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीसह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अचानक खूप जास्त सक्रीय झाल्या असून महाविकास आघाडीतील अनेक नेते सध्या अडचणीत येत चालले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल परब यांच्यासह अन्य काही नेते या तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

महाविकास आघाडीतील नेते हे भाजप तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. तर भाजप जे काही सुरु आहे ते नियमांनुसारच सर्व कारवाही होत असल्याचा दावा करत आहे. या कारवाईचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचे भाजप नेते सांगत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य करताना भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

‘राज्यात सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कुठल्याही टोकाला जायचं ठरवलं आहे. ईडी आणि सीबीआय यांना याच कामासाठी ठेवलं आहे,’ असा घणाघात मुश्रीफ यांनी केलाय. यासोबतच, ‘कुणाला कुठेही ते अडकवतील, कुणाच्याही मागे लागतील, त्यांनी सर्व निती नियम गुंडाळून डोक्याला बांधले आहेत. सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, हे सरकार 100 टक्के पाच वर्षे टिकेल कुणी काहीही करु शकत नाही,’ असा ठाम विश्वास देखील हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!