🕒 1 min read
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या ढासळलेल्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवासी मात्र बेहाल झाले आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स, गाड्यांना होत आहे. अव्वाच्या सव्वा दराने भाडे वाढ करुन खाजगी एजंट मालामाल होत आहेत. मात्र खासगी गाड्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहेत. रविवारी सुरू झालेला संप मंगळवारी (दि.९) तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे मोठे हाल सुरु आहेत. ज्याठिकाणी ३०० रुपये मोजावे लागत होते. त्याच ठिकाणी आता खाजगी ट्रॅव्हल्स हजार ते बाराशे रुपये भाडे आकारत आहेत. या सर्वांमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे आरटीओ मात्र गायब आहे.
जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जाईल. असे याआधी आरटीओने स्पष्ट केले होते. त्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली होती मात्र हे पथक कागदावर असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना अवाच्या सव्वा दराने भाडे देऊन खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असून यात खाजगी दलालांचा फायदा होत आहे. अनेक जण आहेत त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. सुट्ट्या संपल्याने कामावर हजर होण्याची सूचना मिळूनही अनेकांचा नाईलाज होत आहे.
प्रवास करायचा कसा?
जळगावला जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सने आम्हाला ११०० रुपये भाडे प्रति व्यक्ती सांगितले. तेच भाडे बसने ३०० रुपये लागते. एेन दिवाळीत प्रवासावर एवढा खर्च करणे झेपणारे नाही. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत आहे. या परिस्थितीत आम्ही याठिकाणीच अडकून पडलो आहोत. आता यापुढे बसचा संप मिटेपर्यंत प्रवास करायचा कसा असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात
- प्रकृती बिघडल्याने रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल
- अंडरवर्ल्ड संबंधाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मलिकांनी केला गोपीनाथ मुंडे आणि दाऊदचा नामोल्लेख, म्हणाले..
- उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार- नवाब मलिक
- ‘हे तर ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक’, भाजपची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

