Share

शिवसेनेच्या राजकारणामुळे राज्यात गावागावात मुंबईकरविरुद्ध गावकरी असा वाद पेटला : दरेकर

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात गावागावात मुंबईकरविरुद्ध गावकरी असा वाद पेटल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आज मुख्यमंत्री गावी सोय नसल्याचं सांगत आहेत. हे राज्य सरकारच अपयश आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, सेना-NCP राहणार उपस्थित

प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोरोना उपाययोजनांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मुंबईकरांची गावी व्यवस्था नसल्याची कबुली देत त्यांनी गावी जाऊ नका म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगणं हे सरकारच अपयश आहे. तसेच शिवसेनेच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात गावागावात मुंबईकरविरुद्ध गावकरी असा वाद पेटला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी वेळीच आघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादी तुमचे राजकारण संपवून टाकेल

तसेच आरोग्य सुविधांबाबत घेतलेल्या आढाव्याबाबत म्हणाले की, रत्नागिरीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत चालला आहे. जिल्ह्यात डेरवणमधल्या वालावलकर रुग्णालयात लवकरच स्वॅब टेस्टिंग मशीन आणण्यात येणार आहे.

#महाराष्ट्र_बचाओ : इतर राज्यांप्रमाणे राज्य सरकारनेही आर्थिक पॅकेज जाहीर करावे : हर्षवर्धन पाटील

दरम्यान प्रवीण दरेकर आणि इतर आमदार हे रेड झोन मधून आले आहेत. त्यामुळे त्यांनी तीन दिवस क्वारंटाईन व्हावे, असा टोला राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांवर बोलण्याएवढे प्रवीण दरेकर मोठे नाहीत, तसेच भाजप आमदारांच्या या दौऱ्यामुळे कोकणला कोरोनाचा धोका होऊ शकतो, असेही उदय सामंत म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!