Share

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, सेना-NCP राहणार उपस्थित

Published On: 

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस शासित राज्यांची व भाजप विरोधी पक्षांची 22 मे ला बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख देखील उपस्थित राहणार आहेत. तर देशातील अन्य विरोधी पक्षांचे प्रमुख देखील उपस्थित असणार आहेत.

#महाराष्ट्र_बचाओ : राज्य सरकारला जाग येण्यासाठी ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ भाजपने दिला नारा !

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. १७ विरोधी पक्ष या बैठकीला हजर राहणार असून सपा आणि बसपाचे नेते उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.या बैठकीत कामगार कायदा सुधारणा, स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाले या तीन मुद्दयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी १७ पक्षांनी सहमती दर्शविली आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या देखील उपस्थित राहणार आहेत.

‘रेल्वे उपलब्ध असूनही राज्यशासनाकडून योग्य पाऊले न उचलल्याने मजूर पायी निघाले’

या बैठकीत कामगारांच्या बदलत्या कायद्यावर चर्चा होणार आहे. भाजपशासित राज्यांकडून कामगार कायद्यात बदल केले जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कामगार कायदा आणि स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाल्यांच्या समस्या या तीन मुद्द्यांवर सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समविचारी पक्षांसोबत चर्चा करणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी वेळीच आघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादी तुमचे राजकारण संपवून टाकेल

दरम्यान दुसरीकडे राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलं आहे, असा आरोप करत भाजपने ठाकरे सरकार विरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले आहे. हे आंदोलन देखील 22 मे ला होणार आहे. त्यामुळे एकीकडे सोनिया गांधींची बैठक आणि दुसरीकडे भाजपचे आंदोलन असे चित्र पाहायला मिळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!