Share

जालन्यात दुपारनंतर मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट, विनाकारण फिरणाऱ्यांची थेट कोवीड चाचणी

Published On: 

जालना: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लागू संचारबंदी, विनाकारण फिरणाऱ्यांची थेट कोवीड चाचणी करण्यात येत असल्याने व वाढत्या उन्हामुळे गुरुवारी दुपारनंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर काहीसा शुकशुकाट पहायला मिळाला. बाजारातील दुकानेही बंद दिसून आली. दरम्यान, मुख्य चौकांमध्ये बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना अडवून परत माघारी पाठवताना आढळून आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही सकाळी सात ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. असे असले तरी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गत दोन दिवसांपासून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची रपीड अँटीजेन चाचणी सुरू केली आहे. शहरात मुख्य चौकांमध्ये दोन दिवसात ३१४ नागरिकांच्या तपासणीत ११ जण बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या या मोहिमेचा गुरुवारी चांगला परिणाम दिसून आला. विनाकारण रस्त्यावर फिरलो तर आपलीही कोरोना चाचणी केली जाईल या भीतीने अनेकजण घरीच थांबल्याचे दिसून आले. दरम्यान, सकाळी ११ वाजता मामा चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येणाऱ्यांची वाहने अडवून त्यांना माघारी पाठवले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातही असेच चित्र पहावयास मिळाले. बसस्थानक परिसरातही रस्त्यावर ड्रम आडवे लावून पोलीस कर्मचारी नागरिकांना घरी थांबण्याचा सल्ला देताना दिसले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!