Share

ठाण्याच्या भाजीविक्रेत्याकडून तब्बल ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त, पाकिस्तानातून तस्करी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन राजकारण सुरु असतानाच गुजरातमध्ये पुन्हा एक खळबळजनक समोर अली आहे. गुजरातमध्ये ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामध्ये हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. याअगोदरही गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होते.

या ड्रग्जची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी गुजरात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या तिघांना गुजरात पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यातील सज्जाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. सज्जाद हा भाजीपाल्याचा विक्रेता आहे. महाराष्ट्र कनेक्शन लागल्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जवळपास १६ किलो हेरॉईन जप्त केले आहे. हेरॉईनसोबत ६६ किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आले आहे. याची किंमत जवळपास ३५० कोटी रुपये असल्याचं समजतेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे येत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड मारत ड्रग्ज जप्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!