🕒 1 min read
नागपूर : राज्यात अमली पदार्थ विरोधी जोरदार कारवाई करण्याचे काम चालू आहे. यावरून राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस निवासस्थानाचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस दलाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
तरुण वर्ग अमली अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकून उध्वस्त होऊ शकते. याबाबत पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी पोलीस दलाला केली. तसेच पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागेल. त्यासाठी शाळा, महाविद्यालय परिसरात देखील लक्ष केंद्रित करावे लागेल, असेही ते
म्हणाले.
यादरम्यान, डीएनए विश्लेषण विभागाचे ऑनलाइन उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अंमली पदार्थांच्या तस्करीवरून जगभरातील अमली पदार्थ फक्त महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष गटच पार पाडत आहे, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
अंमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून राज्याला बदनाम करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला अशा पद्धतीने डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे परिषदेत दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
