मुंबई : भारतीय संघ सध्या वेगवेगळ्या देशाच्या दौऱ्यावर आहे. प्रमुख खेळाडूसह विराट कोहली हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तर इतर खेळाडूसह शिखर धवन श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला पर्यायी खेळाडू म्हणून पृथ्वी शॉचे नाव समोर आले आहे.
मात्र पृथ्वी शॉ मर्यादीत षटकाच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यावरुन जर तो इंग्लंडला रवाना झाला तर श्रीलंका दौऱ्यात सलामीवीर म्हणून शिखर धवनसोबत कोणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे. यादरम्यान या दौऱ्यातील काही खेळाडूना सलामीला खेळण्याची संधी मिळु शकते. यातील काही खेळाडूसाठी हे आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरेल.
सलामीवीर म्हणून पहिले नाव आहे इशान किशनचे त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सलामीला चांगली कामगिरी केली होती. दुसरा पर्याय आहे देवदत्त पडिक्कलचा आयपीएलमध्ये बॅटचा तडाखा दिल्याने त्याची श्रीलंका दौऱ्यात निवड झाली आहे. पुढील पर्याय आहे पुणेकर ऋतुराज गायकवाडचा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडुन खेळताना त्याने सातत्याने चांगली कामगीरी केली आहे. तर अखेरचा पर्याय आहे नितीश राणाचा त्याने केकेआरकडुन आयपीएलमध्ये सलामीला फंलदाजी केली आहे. यातील इशान किशन वगळता इतर खेळाडूसाठी संधी मिळाली तर आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- बीसीसीआयकडुन स्थानीक क्रिकेटच्या हंगामाची घोषणा, पगारवाढीचेही दिले संकेत
- श्रीलंकेत असलेल्या टीम इंडियाचा सराचा व्हिडिओ व्हायरल ; प्रशिक्षकाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- ‘तो युवा खेळाडुमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो’ इरफानने केले द्रविडचे कौतुक
- स्मृती मंधानाचा अफलातून कॅच ; व्हिडिओ होतोय व्हायरल
- श्रीलंका दौरा हा द्रविड आणि बीसीसीआयसाठी सारखाच महत्वाचा- लक्ष्मण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

