Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील सहा गावे दत्तक

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन हब’ अंतर्गत दीन दयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राअंतर्गत हा उपक्रम सुरु झाला आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी कन्नड तालुक्यातील सहा गावे विद्यापीठाने दत्तक घेतलेली आहेत. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) २.६२ कोटी अनुदान देखील मंजूर केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन हब’ अंतर्गत दीन दयाल उपाध्याय कौशल विकास केंद्र, संगणक विज्ञान आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांनी मागास समाजाच्या सक्ष्मीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रमासाठी कन्नड तालुक्यातील सहा गावे दत्तक घेतली आहे. या मध्ये कन्नड तालुक्यातील चिकलठाण, नरसिंगपूर, देवगाव, लोहागाव, नागद आणि अंधानेर या सहा गावांपैकी आतापर्यंत अनुसूचित जाती, जमाती समाजातील लोकांना विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, संगणक आणि औषधी वनस्पती क्षेत्रात विशेष कौशल्याचे प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी २४ मे २०१९ सुरू केली.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हबने मार्चमध्ये चिकलठाण या गावात उपक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण देखील केले आहेत. या गावातील २७३ ग्रामस्थांना प्रशिक्षण देखील दिले आहे. याशिवाय एकूण आठ सुक्ष्म उद्योग देखील सुरू केलेले आहेत. मराठवाड्यात प्रथमच चार एकर क्षेत्रावर औषधी वनस्पतींची लागवड देखील केली आहे. नेमणूक केलेले कर्मचारी चिकलठाणमध्ये पूर्ण कालावधीसाठी वास्तव्यास राहिले देखील होते. या वेळी विविध तीन विभागातील प्राध्यापक तसेच विभागांतील तरुण आणि उत्साही प्राध्यापकांचे पथक या गावांना नियमित भेटी देत आहे.

कन्नड तालुक्यातील मागास समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक कृती आराखडाही तयार केला आहे. या उपक्रमास कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचेही खुप सहकार्य लाभले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन हब’ अंतर्गत दीन दयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राअंतर्गत हा उपक्रम सुरु झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!