अहमदनगर : ज्या रेमडेसिवीरसाठी लोक धावाधाव करीत आहेत, ते कोरोनावरील रामबाण उपाय नाही. रुग्णांचे नातेवाईक जेवढी धावपळ करतील तेवढा त्याचा काळाबाजार केला जाईल, आर्थिक लुटमार होईल असे वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे यांनी केले आहे. जिल्ह्यातील रुग्णांचे रेमडेसिवीरअभावी होणारे हाल पाहू शकत नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन इंजेक्शन आणली, असे सांगणारे सुजय विखेंनी इंजेक्शनच्या उपयोगाबद्दल संशय घेतलाय.
विखे यांनी रविवारी पारनेर तालुक्यात विविध कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, डॉक्टर या नात्याने जबाबदारीने सांगतो की, आमच्या विळद घाट येथील हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनचे वेगवेगळे अनुभव नोंदले गेले आहेत. २२ ते ३० वयोगटातील अनेक रुग्णांना या इंजेक्शनचे सहा डोस देऊनही त्यांचा मृत्यू झाला आहे.
याउलट एकही इंजेक्शन न देता साठ वर्षांवरील अनेक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर नेमकी उपचार पद्धती नाही, नेमके कोणते औषध काम करते, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांनी मनातील चिंता काढून टाकावी. रेमडेसिवीर मिळाले नाही म्हणून आपला रुग्ण दगावेल ही भीती मनातून काढून टाकावी असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या आठवड्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणले होते. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: काल शनिवारी फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली. पण स्वत: एवढी धावाधाव करून आणलेल्या इंजेक्शननंतर रुग्णांच्या नातेवाईकांना त्यासाठी धावाधाव न करण्याचे आवाहन त्यांनी केलेय. त्यामुळे आता विविध चर्चा सुरू झाल्यात.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाशी लढणाऱ्या भारताला मदत करा’, ग्रेटा थनबर्गचे जगाला आवाहन
- दिलासादायक बातमी! भारतातील रिकव्हरी रेट युरोप-अमेरिकेपेक्षा चांगला
- ‘आ.गिरीश महाजन दाखवा, दहा लाख मिळवा’, राष्ट्रवादीचे आवाहन
- आता हेच बाकी होते, म्हणे ‘वकिलांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या’
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’


