Share

‘कोरोनाशी लढणाऱ्या भारताला मदत करा’, ग्रेटा थनबर्गचे जगाला आवाहन

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी देशात जवळपास साडेतीन लाख कोरोना रुग्ण आढळून आलते. गेल्या सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे आढळून येत आहे. देशात आरोग्यसेवा कमी पडू लागल्या आहे, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान बदलासंबंधी काम करणारी स्वीडिश कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने भारतातील कोरोनाच्या स्थितीवर एक ट्वीट केलंय. कोरोना विरोधात संघर्ष करणाऱ्या भारताला जागतिक समुदायाने मदत करावी असे आवाहन तिने केलेय.

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली ही स्थिती अत्यंत वेदनादायी आहे. जागतिक समुदायाने पुढाकार घेतला पाहिजे आणि भारताला आवश्यक ती सर्व मदत केली पाहिजे असं आवाहन ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे. दरम्यान, तिने ट्विट करण्याच्या अगोदर जगभरातील देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तान, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी भारताला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

कोरोनामुळे भारतात दररोज पाच हजार लोकांचा मृत्यू होईल असा धक्कादायक निष्कर्ष वॉशिंग्टन विद्यापीठाच्या अभ्यासात समोर आला आहे. सध्या सातत्याने भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढतेय. एप्रिल ते जुलै या काळात भारतातील तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!