🕒 1 min read
औरंगाबाद: जर आपण लसीचे दोन डोस घेतलेले असतील तर ओमायक्रोन आपले काहीही बिघडवू शकत नाही. ओमायक्रोननंतर कोरोना पूर्णपणे संपणार आहे. केवळ औषधोपचाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे काळजी करायची नाही. पण घ्यायची आहे. त्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाइजरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब शहरातील प्रत्येक नागरिकांनी करावा. त्याचबरोबर ज्यांनी आत्तापर्यंत लसीकरण करून घेतलेले नाही अशांनी लवकरात लवकर लस द्यावी. अन्यथा ओमायक्रोनचे घातक परिणाम होऊ शकतात. असे आवाहन तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉनने आता देशासह राज्याचीही चिंता वाढवली आहे. राज्यातील ओमायक्रोनबाधितांची संख्या हळूहळू वाढतांना दिसत आहे. आता औरंगाबाद शहरातही ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हाय अलर्टवर गेले आहे. शहरात नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला असता फार घाबरून जाण्याचे कारण नसून प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास ओमायक्रोनची चिंता नसल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
साध्या पॅरासिटामॉल गोळीने ओमायक्रोन बरा होऊ शकतो
ओमायक्रोन हा माईल्ड व्हेरीयंट आहे. ओमायक्रोननंतर कोरोना संपणार आहे. डेल्टा, ओमायक्रोन हे एकाच वर्गातले संसर्ग आहेत. ज्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांना ओमायक्रोनचा कुठलाही त्रास जाणवणार नाही. साध्या पॅरासिटामॉल गोळीने देखील ते बरे होऊ शकतात. मात्र ओमायक्रोन हा दुप्पटीने प्रसार करतो. त्यामुळे त्याला आपण सहजतेनेही घेऊ शकत नाही. नाकातोंडावर व्यवस्थित मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, आणि सॅनिटाइजरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा. अशी माहिती निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी(Dr. Sundar Kulkarni) यांनी व्यक्त केले.
ओमायक्रोन घातक नाही मात्र तो लवकर पसरतो
कोरोनाचे ज्याप्रमाणे हळूहळू रुग्ण वाढत गेले तसेच ओमायक्रोनचे देखील वाढतील मात्र लसीकरण झालेल्यांना कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. तरीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग प्रत्येकाने पाळावे. ज्याप्रमाणे आता सार्वजनिक कार्यक्रम जसे लग्न येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या नवीन वर्षाच्या पार्टीज यांच्यावर निर्बंध असायला हवे. त्याचप्रमाणे साधी सर्दी-खोकला असला तरीही आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी. आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार ओमायक्रोनबाधित घरीही बरे होऊ शकतात. अधिक रुग्णांना अॅडमिट करण्याची गरज पडणार नाही असे मत पहिल्या कोरोना रुग्णावर उपचार केलेले डॉ. वरुण गवळी(Dr.Varun Gavali) यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं-नारायण राणे
- जो रूटने रचला इतिहास; केला ‘हा’ खास विक्रम
- दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी- केशव उपाध्ये
- “इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे”, राऊतांनी काढला राज्यपालांना चिमटा
- ‘भारताला 350 धावांत गुंडाळले तर सामना जिंकू’; द. आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजाची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

