मुंबई: कंगना राणावतने १९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे वक्तव्य केल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. त्याला ज्येष्ठ अभिनतेते विक्रम गोखले यांनी देखील पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे वादात आणखी भर पडली होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी कंगनाच्या व्यक्तव्याचा चांगलंच समाचार घेतला आहे. ते मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलत होते.
कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरूंचेही योगदान आहे. त्यामुळे इतिहास बदलण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कंगनाच्या वक्तव्याची नोंद घेण्याचीच गरज नाही, असा टोला बुधवारी मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. कंगनाच्या व्यक्तव्यवरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. कंगनाविरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे केली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या कंगनाला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान असल्याची जहरी टीका केली होती. आता बुधवारी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलताना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. इतिहास बदलण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि कंगनाच्या व्यक्तव्याची नोंद घेण्याचीही गरज नाही, असं भुजबळ यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- न्यूझीलंडला मोठा धक्का: केन विल्यमसननंतर आता काईल जेमिसननेही टी 20 मालिकेतून घेतली माघार
- ‘…आणि रात्री स्त्रीवर बलात्कार करतात’; वीर दासच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात तक्रार दाखल
- अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- ‘त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची गरज’, व्यंकटेश अय्यरने केले राहुल द्रविड यांचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

